nrusimhasaraswatidham

About Us

Home > About Us

Our History

सुमारे ४० वर्षांपूर्वीचा एक सत्यसंकल्प पूर्णत्वास गेला आणि उभे राहिले श्री नृसिंह सरस्वती धाम (श्रीगुरु श्रीशंकर मंदिर). ‘जे जे मन इच्छावे, ते ते सद्गुरू कृपेने लाभावे’ या उक्तीचा संपूर्ण अर्थ उलगडून दाखविणारे हे मंदिर. त्याचा थोडक्यात परिचय सद्गुरूंच्याच प्रेरणेने देण्यात येत आहे.
प. पू. सद्गुरू श्री दादामहाराज यांच्या घाटकोपर येथील निवासस्थानी ५० वर्षांपूर्वी एका साधूंचे आगमन झाले होते. त्यांनी श्री दादामहाराजांना सांगितले की तुमच्या कडून एका मंदिराचा संकल्प पूर्णत्वास येणार आहे.
“क्षेत्रोक्षेत्री लीला विहारी” अशा महाराजांच्या या संकल्पपूर्ती साठी अत्यंत शांतपणे, संयमाने आणि साक्षीभावाने श्री दादामहाराजांची वाटचाल त्या दिशेने सुरू राहिली. ट्रस्टची स्थापना झाली.
या ५० वर्षांच्या संपूर्ण प्रवासात श्री प्रभुचे चैतन्य भरून आहे. श्री चरणांसोबतच प्रवास चालू आहे, याची जाणीव ठायी ठायी होत होती.
अनेकांना द्रष्टांत झाले. अनेक कठीण प्रसंगातून महाराजांच्या प्रेरणेने अनपेक्षित मदत मिळत गेली.

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीश्रीपाद श्रीवल्लभ आणि पंततपावन दिनोद्धारक श्रीदत्त महाराज यांच्या अत्यंत सुंदर अशा मूर्तींच्या स्थानात २ वर्षांच्या कालावधीतले अकल्पित आगमन अचंबित करणारे होते. हा सर्व श्री महाराजांचा लिलानिवास होता.

समजून घ्यायचे ठरवले तर एक पुस्तक तयार होईल. अंतःकरणी प्रेरणेने आणि उत्स्फूर्तपणे माणसं जोडली गेली आणि प. पू. श्री दादामहाराजांनी सोडलेला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिर निर्मितीचा संकल्प त्यांच्या कृपाशिर्वादाने दि. २९ मार्च २०१२ रोजी पूर्णत्वास गेला. काटई, डोंबिवली (पूर्व) येथे श्री नृसिंह सरस्वती धाम दिमाखात उभे राहिले.

श्रीस्वामींच्या मूर्तींचे आगमन

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, श्रीश्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीदत्त महाराज यांचे विग्रह येथे विराजमान आहेत. एका विलक्षण शांततेची आणि चैतन्याची येथे अनुभूती येते.
अविरत चालू असलेले भजन, पूजन, अर्चन, विविध यज्ञ, अनेक इष्टि, प्रत्येक वेद पठन (जटा, घन इत्यादी), पालखी, नवरात्रोत्सव इत्यादींमुळे स्थानाचे पावित्र्य आणि मांगल्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे.

श्रीस्वामींच्या आगमनाचा योग

आता सर्वांना ओढ लागली होती ती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आगमनाची. त्यांच्या आगमनाचे पडघम वाजू लागले असतानाच एक विलक्षण योगायोग जुळून आला. साडेतीन शक्तीपीठे आणि राजराजेश्वरी देवी जगदंबा मातेच्या रूपाने देवी श्री दुर्गापरमेश्वरी यांचे आगमन झाले.
विष्णुस्वरूप श्रीबालाजी, श्रीदत्तात्रेय स्वामी महाराज यांच्या रूपात येथे विराजमान असतानाच श्रीपद्मावतीचेही उत्सव मूर्ती स्वरूपात आगमन झाले.
आराध्य दैवत श्रीदत्तात्रेय, सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती स्वामी, चौसष्ट योगिनी या सहा देवींच्या रूपात विराजमान असताना श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी (श्री टेंबेस्वामी) धावून येणारच होते. जणू देवस्थान पूर्णत्वास गेले.

प्रतिष्ठापना सोहळा

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि सहा देवींच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा नवरात्रात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
सर्व साधक भक्तांवर भगवान दत्तात्रेय आणि भगवती जगदंबा यांची पूर्ण कृपा होऊन त्यांना कृतार्थतेचा लाभ व्हावा, यासाठीच हा स्थानपरिचय.

A Sanctuary of Peace and Devotion

Welcome to Nrusimha Saraswati Dham worship, reflection, and community. Rooted in tradition and spiritual teachings, our temple offers a place of serenity and unity for all.

Experience the divine grace and timeless wisdom that guide our path. All are welcome to join in faith and devotion.